लेखिकेची संपुर्ण माहिती इथे पहा

Sunday, January 17, 2010

पुणे मेळावा - आयोजकांचे अभिनंदन

3 comments


पुणे येथे - मराठी ब्लॉगर्स चा मेळावा जो यशस्वी पार पडला त्याबद्दल सर्व आयोजकांचे अभिनंदन. या मेळाव्यात जे विषय चर्चीले गेले आहेत ते सर्व भविष्यात घडून येऊन, मराठी ब्लॉग हे एक नवीन आधुनीक माध्यम म्हणून यशस्वी व्हावे अशा माझ्या शुभेच्छा

( अधिक वृत्तांत श्री अनिकेत यांच्या अनुदिनीत इथे पाहू शकता )


मी स्वतः लेखिका आहे. साहित्य संमेलना बाबत खालील माहिती श्री. अनिकेत यांच्या वृत्तांतात वाचली .

1) स्नेह-मेळाव्यासाठी काही पुस्तक प्रकाशकांचीही हजेरी. शोध नविन लेखकांचा. लवकरच त्या प्रकाशकांची चांगल्या ब्लॉगर्सशी ह्या मेळाव्याच्या आयोजकांतर्फे ओळख करुन देण्यात येईल.
2) मराठी साहीत्य संमेलनात ब्लॉग्सतर्फे प्रसिध्द केल्या जाणाऱ्या साहीत्याची ही दखल घेतली जावी असे अनेकांना वाटते आणि त्यासाठीचे निवेदन येत्या काही दिवसांत अखिल भारतीय संमेलनाचे नवनिर्वाचीत अध्यक्ष डॉ.द.भि.कुलकर्णी ह्याच्याकडे एका शिष्टमंडळातर्फे सुपुर्त केले जाईल. स्नेहमेळाव्याच्या आयोजकांनी हा ठराव आणि त्यासाठीचे निवेदन तयार करुन ठेवले आहे. कुलकर्णी साहेबांची वेळ मिळतात ते त्यांच्याकडे सुपुर्द केले जाईल.
3) पुण्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहीत्य संमेलनात मराठी ब्लॉगर्ससाठी एक स्टॉल स्पॉन्सर्ड झाला आहे. ह्या स्टॉल तर्फे संमेलनात येणाऱ्या वाचकांना ब्लॉग्सबद्दल, त्यावरील साहीत्याबद्दल अधीक माहीती दिली जाईल तसेच काही निवडक ब्लॉग्सचे साहीत्य आणि त्या ब्लॉग्सचे दुवे त्या त्या लेखकांच्या संमंतीने ह्या स्टॉलवर मांडले जातील. याबाबत अधीक माहीती येत्या काही दिवसांत प्रसिध्द केली जाईल

एक लेखिका म्हणून याबात जे निर्णय होतील त्याबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे.

धन्यवाद
उज्ज्वला केळकर
सांगली

----------------------------------

माझी इतर माहिती इथे पहा.

 
MySpace Backgrounds